Gas Cylinder Price Today: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला थोडासा दिलासा देणारी ही माहिती आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सलग पाचव्यांदा घट झालेली आहे. सरासरी १३४ रुपयांनी या किमती कमी झाल्या असून, याचा मोठा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे.
Gas Cylinder Price Today
सलग ५ महिन्यांपासून घट!
या वर्षी मार्च महिन्यापासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मार्च ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत एकूण १७० रुपयांची कपात करण्यात आलेली होती. जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे ही कपात शक्य झालेलं आहे. यामुळे केवळ व्यावसायिकांनाच नव्हेत, तर एकूणच अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला का?
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घट नोंदवलेली असली तरी, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये मात्र कोणताही बदल झालं झाल्याचे पाहायला मिळत नाही. एप्रिल महिन्यात घरगुती गॅसच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झालेली होती. आणि त्यानंतर त्यांच्या किमती स्थिर आहे. त्यामुळे, सामान्य गृहिणींना या घसरणीचा थेट फायदा मिळणार नाहीत. असे असले तरी तुम्ही उज्वला योजनेचे लाभार्थी असाल त्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळत आहे तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर हालचाली देखील सुरू आहेत की घरगुती गॅसच्या किमतीमध्ये देखील लवकरच घसरून घेऊ शकते अशी माहिती देण्यात येत आहे.
- IOCL (इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड) च्या आकडेवारीनुसार, देशातील चार प्रमुख महानगरांमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती पुढील प्रमाणे दिली आहेत:
- दिल्ली: ३३.५ रुपयांची घट होऊन आता दर १६३१.५० रुपये आहे.
- मुंबई: ३४ रुपयांची घट होऊन आता दर १५८२.५० रुपये आहे.
- कोलकाता: ३४.५ रुपयांची घट होऊन आता दर १७३४.५० रुपये आहे.
- चेन्नई: ३४.५ रुपयांची घट होऊन आता दर १७८९ रुपये आहेत.
प्रमुख शहरांमधील घरगुती गॅसचे दर?
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नसला तरी, त्यांचे दर एप्रिल महिन्याप्रमाणेच कायम आहे.
- दिल्ली: ८४० रुपये.
- कोलकाता: ८५९ रुपये.
- मुंबई: ८५२.५० रुपये.
- चेन्नई: ८६५.५० रुपये.
जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किमती कमी झाल्याने व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्याचे स्पष्ट झालेले आहेत. भविष्यात हे दर आणखी कमी होतील अशी आशा आहेत, ज्यामुळे व्यावसायिकांना आणखी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकेल.
मित्रांनो, अशाच प्रकारच्या सरकारी योजना माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. तसेच ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या इतर व्हाट्सअप ग्रुपला तसेच तुमच्या इतर मित्रांना देखील नक्की शेअर करा