PM Kisan Yojana List : शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हफ्ता (Pm Kisan 20th Installment) शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झालेले आहे.
पीएम किसानचा २० वा हफ्ता खात्यात जमा
२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील सुमारे साडेनऊ कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये २०,५०० कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाच हप्त्याची रक्कम मिळाली आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर, तुम्हाला मोबाईलवर एसएमएसद्वारे त्याची माहिती मिळाली असेल.
तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही, असा करा चेक:
तुमच्या खात्यात हफ्ता आला आहे की नाही हे तपासण्यासाठी ही सोपी पद्धत वापरा:
- पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईटवर जा.
- ‘फार्मर कॉर्नर’ (Farmer Corner) मध्ये ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ (Beneficiary Status) वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका.
- स्टेटसमध्ये जर ‘E-kyc’, ‘Land Seeding’ आणि ‘आधार बँक सीडिंग’ या तिन्ही ठिकाणी ‘YES’ (होय) असे दिसत असेल, तर तुमचा हप्ता तुमच्या खात्यात नक्कीच जमा झाला असेल.
या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकता. जर हफ्ता जमा झाला नसेल, तर तुमच्या माहितीमध्ये काही त्रुटी असू शकतात.