आजपासून गॅस सिलिंडर स्वस्त झाला; नवीन दर जाहीर! LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे! आज, 1 ऑगस्ट 2025 पासून, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी घसरण करण्यात आलेली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅसच्या किमतीत तब्बल ₹133.50 ची घट झालेली आहेत.

LPG Gas Cylinder Price

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घसरण

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे ही कपात व्यावसायिकांना दिलासा देणारी ठरत आहे. मागील 4 महिन्यांत व्यावसायिक गॅसच्या दरात चढ-उतार पाहायला मिळालेले होते, परंतु आता झालेली ही कपात नक्कीच स्वागतार्ह आहेत.

ऑगस्ट २०२५ मध्ये लॉन्च होणार सर्वात स्वस्त मोबाईल! किंमत खूपच कमी; संपूर्ण माहिती New Mobile Launch August 2025

सर्व महिलांना महिन्याला 7000 रुपये मिळणार; बिमा सखी योजना अर्ज, पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण माहिती Bima Sakhi Yojana
सर्व महिलांना महिन्याला 7000 रुपये मिळणार; बिमा सखी योजना अर्ज, पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण माहिती Bima Sakhi Yojana

प्रमुख शहरांमधील 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे नवीन दर (1 ऑगस्ट 2025):

  • नवी दिल्ली: ₹1,765.00 वरून ₹1,631.50
  • कोलकाता: ₹1,869.00 वरून ₹1,735.50
  • मुंबई: ₹1,716.50 वरून ₹1,583.00
  • चेन्नई: ₹1,923.50 वरून ₹1,790.00

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाहीत. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 8 एप्रिल 2025 पासून आतापर्यंत स्थिर आहेत. मागील चार महिन्यांपासून या दरांमध्ये कोणतीही वाढ किंवा घट झाली नाहीत.

प्रमुख शहरातील 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर पुढीलप्रमाणे:

  • दिल्ली: ₹853.00
  • मुंबई: ₹852.50
  • कोलकाता: ₹879.00
  • चेन्नई: ₹868.50

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान किती मिळते?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) सुमारे 10 कोटी कुटुंबांना प्रत्येक सिलिंडरसाठी ₹300 चे अनुदान दिले जात आहेत. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे, उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाला गॅस सिलिंडर केवळ ₹552 मध्ये मिळत आहेत.

सोयाबीन दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह बाजार भाव पहा! Soyabean Rate Today
सोयाबीन दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह बाजार भाव पहा! Soyabean Rate Today

Leave a Comment