रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडणे किंवा कमी करणे, अत्यंत सोपे! प्रक्रिया पहा

नमस्कार मित्रांनो, आपण एक महत्त्वाचा आणि उपयुक्त विषय घेऊन आलेलो आहोत. — रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडायचे आहे, ते पण घरबसल्या मोबाईलवरून!

जर तुमच्या कुटुंबात नवीन सदस्याचा समावेश झालेला असेल, तर त्याचे नाव रेशन कार्डमध्ये नोंदवणे अत्यावश्यक असतेच. कारण त्याशिवाय आपल्याला रेशन दुकानात धान्य देखील दिले जात नाही. कारण रेशन कार्ड हे केवळ धान्य मिळवण्यासाठीच नाही, तर अनेक शासकीय योजनांसाठी ओळखपत्र म्हणून देखील रेशन कार्डचा वापर करण्यात येतो.

चला तर मग आपण, संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहूया — ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींसह सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate
एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate

नवीन नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

नोंदणीपूर्वी पुढील कागदपत्रे तयार ठेवा:

  • नाव जोडल्या जाणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड आवश्यक
  • जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला (DOB साठी) आवश्यक
  • कुटुंब प्रमुखाचा फोटो आवश्यक
  • पत्त्याचा पुरावा – वीजबिल, बँक पासबुक इ.
  • आवश्यक असल्यास – उत्पन्नाचा दाखला (income certificate) आवश्यक

ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करता येते, किंवा फोटोकॉपीसह ऑफलाइन सादर करता येते

ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डमध्ये नाव कसे जोडायचे?

  • rcms.mahafood.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
  • लॉगिन किंवा नवीन युजर असल्यास आधार क्रमांक टाकून OTPद्वारे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे.
  • Apply/Edit Ration Card Application’ हा पर्याय निवडून घ्यायचा.
  • तिथे नवीन सदस्याची माहिती भरा – नाव, वय, नातेसंबंध. इत्यादी माहिती भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचे.
  • साधारणपणे ७ ते १० दिवसांत अपडेट होते.

मोबाईल अ‍ॅपद्वारेही ही प्रोसेस काही ठिकाणी करता येत आहे. मोबाईल आणि इंटरनेट असल्यास ही पद्धत अतिशय सोपी आहेत.

या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार; तुमचा जिल्हा आहे का? जिल्ह्याची यादी पहा Shaktipeeth Highway District List
या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार;जिल्ह्याची यादी जाहीर Shaktipeeth Highway District

ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्डमध्ये नाव कसे जोडायचे?

  • फॉर्म क्रमांक ८ (mahafood.gov.in वर उपलब्ध) डाउनलोड करा किंवा रेशनिंग/तहसील कार्यालयातून मिळवावे लागेल
  • फॉर्ममध्ये नवीन सदस्याची सविस्तर माहिती करून घ्यायची.
  • सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स जोडा.
  • फॉर्म आणि कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर करायचे.
  • अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते.
  • ३० दिवसांत प्रक्रिया पूर्ण होत असते

रेशन कार्ड डाउनलोड कसे कराल?

  • नोंदणी पूर्ण झाल्यावर rcms.mahafood.gov.in वर परत जा.
  • लॉगिन करा.
  • Download Your Ration Card’ हा पर्याय निवडावा.
  • OTP टाकून तुमचे अपडेटेड रेशन कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड करावे.

अपडेट स्टेटस कसे तपासाल?

  • Know Your Ration Card’ या पर्यायावर क्लिक करायचे.
  • रेशन कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून तुमचा अर्जाचा स्टेटस सहजरीत्या पाहू शकतात.

रेशन कार्डमध्ये नवीन नावाची नोंदणी ही अत्यंत सोपी आहे. फक्त योग्य माहिती, कागदपत्रे आणि थोडा संयम आवश्यक आहे. ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही मार्ग प्रभावी असून, तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते निवडू शकतात.

या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार ladki Bahin Yojana installment
या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार ladki Bahin Yojana installment

Leave a Comment