Ladki Bahin Yojana July List: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळे राज्यामधील लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळतोय. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत. या योजनेचे आतापर्यंत १२ हप्ते वितरित करण्यात आलेले असून असून, लवकरच जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
महायुती सरकारने जुलै २०२४ पासून ही योजना सुरू केलेली आहे आणि त्यासाठी ₹२८,२९० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे होती. महिला व बाल विकास विभागाने ३० जुलै रोजी शासन निर्णय (GR) जारी करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल ₹२,९८४ कोटींचा निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे, आता येत्या २ ते ४ दिवसांत लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या अगोदर पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्यातील सर्व न्यूज चॅनेल तसेच मीडिया रिपोर्ट नुसार मिळालेल्या माहितीनुसार येत आहे.
दरम्यान, महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत, काही कुटुंबांमध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी आहे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याचे समोर आले आहेत.
या माहितीच्या आधारे, जून २०२५ पासून या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहेत. मात्र, पात्र ठरलेल्या सुमारे २.२५ कोटी लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्माननिधी आधीच वितरित करण्यात आलेला आहे. ज्यांचे लाभ तात्पुरते थांबवले आहे, त्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासली जाणार आहे आणि जे पात्र ठरतील, त्यांचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजना नवीन यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/