Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये मॅनेजर पदांच्या १२५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे आहे. सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अनुभवी पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधीच आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.
बडोदा बँक भरतीची सविस्तर माहिती
- भरती संस्था: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
- जाहिरात क्रमांक: BOB/HRM/REC/ADVT/2025/10
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- एकूण जागा: १२५
पदांनुसार जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | मॅनेजर | २३ |
२ | सिनियर मॅनेजर | ८५ |
३ | चीफ मॅनेजर | १७ |
एकूण | – | १२५ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या भरतीसाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त, CA, CMA, CS, CFA, MCA यांसारख्या पदव्याधारक उमेदवारही अर्ज करू शकतात. पदांनुसार उमेदवारांना २ ते ८ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहेत.
महत्त्वाची नोंद: NBFC, सहकारी बँका, लघुवित्त बँका, फिनटेक किंवा ऑनलाइन पेमेंट बँकांमधील अनुभव या भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाहीत.
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
- वयोमर्यादा (०१ जुलै २०२५ रोजी): उमेदवारांचे वय ३४/३७/३५/४०/४२ वर्षांपर्यंत आवश्यक.
- वयामध्ये सूट: SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षे सूट मिळणार.
- अर्ज शुल्क:
- General/OBC/EWS: ₹८५०
- SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹१७५
अर्ज प्रक्रिया कशी?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहेत.
अंतिम तारीख: १९ ऑगस्ट २०२५
तुम्ही ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना देखील या संधीचा फायदा घेता येईल. अधिकृत माहितीसाठी, अर्ज करण्यापूर्वी तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटला भेट द्यावी.