Gold Silver Price :तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असताना, तर या आठवड्यातील सोन्याच्या दरांची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यावर आता, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर बाजारात घसरण झालेली पाहायला मिळत आहे, पण सोन्याच्या दरात मात्र काही ठिकाणी वाढ झाली तर काही ठिकाणी घट नोंदवली गेलेली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) च्या माहितीनुसार
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आकडेवारीनुसार, सोन्याच्या दरांमध्ये या आठवड्यात वाढ झालेली दिसून येत असते येते.
- २५ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹९८,७४८ रूपये पाहायला मिळालेला होता.
- आठवड्याच्या शेवटी (शुक्रवारी) हा दर ₹९९,३७५ रूपये पर्यंत पोहोचला.
- याचा अर्थ, पाच दिवसांत सोन्याचे दर ₹९८७ नी वाढले आहेत. जून महिन्यात सोन्याच्या दराने ₹१ लाखाचा टप्पा ओलांडलेला होता, पण त्यानंतर त्यात घट झाली होती.
देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या दरानुसार, देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर थोडे घसरले पाहायला मिळत आहेत.
- २५ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹९८,३८८ रूपये होता.
- शुक्रवारी हा दर ₹९८,२५३ वर केला होता.
- याचा अर्थ, देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर घसरले असल्याचे पाहायला मिळाले.
टीप: IBJA वेबसाइटवरील हे दर देशभरात सारखे असले तरी, देखील प्रत्यक्ष खरेदी करताना दागिन्यांवर ३% जीएसटी आणि मेकिंग चार्ज .
दागिने खरेदी करताना शुद्धता कशी तपासावी?
सोने खरेदी करताना त्याची शुद्धता तपासणे खूप सोपे झालेले आहे . प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क असतो, ज्यामुळे सोन्याची कॅरेटनुसार शुद्धता कळून येते.
- २४ कॅरेट सोन्यावर ९९९
- २२ कॅरेट सोन्यावर ९१६
- १८ कॅरेट सोन्यावर ७५०
- १४ कॅरेट सोन्यावर ५८५ असे अंक लिहिलेले पाहायला मिळतात
या माहितीचा वापर करून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकतात आणि खरेदीचा योग्य निर्णय घेऊ शकतात.