राज्य सरकारने एचएसआरपी (High Security Registration Plate) नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता नोव्हेंबरपर्यंत ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. जर या मुदतीनंतरही तुमच्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट नसेल, तर तुम्हाला १०,००० रुपयांचा दंड भरावा लागेल.
- कोणाला आवश्यकता नाही? १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना, ज्यांच्याकडे आधीच एचएसआरपी नंबर प्लेट आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
- फिटमेंटचे शुल्क: जर तुम्ही नंबर प्लेट फिटमेंट सेंटरमध्ये बसवत असाल, तर त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, तुम्ही घरी बसवण्याचा पर्याय निवडल्यास, तुम्हाला संबंधित एजन्सीला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
- बल्क बुकिंगसाठी फायदा: एकाच ठिकाणी (उदा. सोसायटी, ऑफिस) २५ किंवा त्याहून अधिक वाहनांची बल्क बुकिंग केल्यास, होम फिटमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही.
- सोय: तुमचे वाहन महाराष्ट्रात कुठेही नोंदणीकृत असले तरी, तुम्ही राज्यातील कोणत्याही अधिकृत फिटमेंट सेंटरमध्ये एचएसआरपी नंबर प्लेट बसवू शकता. त्यामुळे वाहन नोंदणी असलेल्या शहरातच जाण्याची आवश्यकता नाही.