Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो पात्र महिला ज्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठी आनंदाची बातमी नुकतीच पुढे आलेली आहे. महायुती सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहेत.
लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत असताना लाडक्या बहिणींना जुलै हप्त्याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी (1,500 रूपये) सर्व पात्र लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे.
आदिती तटकरे यांची नेमकी घोषणा काय?
“लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार! माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे”, असे ट्विट आदिती तटकरे यांनी केलेले आहेत.
पती-पत्नींसाठी पोस्टाची नवीन योजना ; 9 लाख गुंतवा आणि 13 लाख मिळवा! Post Office New Scheme
Ladki Bahin Yojana
योजनेतून 26.34 लाख महिला अपात्र ठरणार!
एकीकडे हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर केलेली असताना, दुसरीकडे या योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी असल्याची धक्कादायक माहितीही समोर आलेले आहे. खुद्द मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल खुलासा केलेला आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीवरून, सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत असत. तसेच, 14,298 पुरुषांनीही या योजनेचा गैरवापर केल्याचे उघड झालेले आहे. यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करत योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते.
या सर्व अपात्र लाभार्थ्यांना आता योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे यापुढे केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.