राज्यामध्ये महायुती सरकारकडून सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेतील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आली आहेत. या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये अजून पर्यंत अद्याप अनेक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले नाही, त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे की हे पैसे कधी मिळणार. या संदर्भात आता एक नवीन अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे.
Ladki Bahin Yojana July List
मीडिया माहितीनुसार, जुलै महिन्याचा हा हप्ता पंधराशे रुपये या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या, म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या ५ तारखेपर्यंत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. योजनेतील मासिक अनुदान हे महिलांसाठी एक प्रकारे मासिक वेतनच आहे आणि, ते लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी आणि अपात्र महिलांना वगळण्यासाठी सरकारने छाननी करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रक्रियेसाठी प्राप्तीकर भरणाऱ्या कुटुंबांची माहिती केंद्र सरकारकडून मागवण्यात आलेली. त्यामुळे, २.५ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना वगळले जाईल, अशी शक्यता होती.
लडकी बहीण योजना जुलै महिन्याची यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/