Ladki Bahin Yojana July List Today: मुंबई, महाराष्ट्र: महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची आलेली बातमी आहे! महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा जुलै २०२५ महिन्याचा हप्ता आता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
राज्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य सरकारने जुलै महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता ९ ऑगस्ट २०२५ पूर्वी थेट पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारने यासाठी एकूण ₹७४६ कोटींचा निधी वितरित केलाय, हा निधी बीम्स (BEAMS) प्रणालीद्वारे पारदर्शकपणे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. यामुळे, लाखो महिलांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारकडून एक अर्थपूर्ण भेट मिळणार आहेत.
महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा सरकारचा प्रयत्न
या निर्णयाचे स्वागत करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, “ही आर्थिक मदत केवळ तात्पुरती नसून, महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केलेले की, राज्यातील महिलांना अधिक स्वावलंबी बनवण्यासाठी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मदतीने कर्ज, व्यवसाय आणि बाजारपेठेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत महिला बचतगटांना आणि त्यांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी असे उपक्रम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही राबवले जातील.
अफवांवर विश्वास ठेवू नका!
योजनेला एक वर्ष पूर्ण होत असताना काही राजकीय टीकाकारांकडून “ही योजना बंद होणार” अशा अफवा पसरवल्या जात आहे. मात्र, सरकारने हे सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, या योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी विकास किंवा सामाजिक न्याय विभागाचा निधी यामध्ये वापरला जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सहकार्याने ही योजना यशस्वीपणे सुरू आहे.
राज्य सरकारला महिलांविषयी असलेली बांधिलकी या निर्णयातून स्पष्ट दिसते आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून, त्यांचा आत्मविश्वास वाढत आहेत.