मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात काय? तर तुमचा शोध आता संपणार आहे! महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने (MSRTC) नागपूर विभागात विविध पदांसाठी तब्बल ३६७ जागांची मेगा भरती जाहीर केलेली आहे. दहावी पास उमेदवारांपासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांसाठी ही एक उत्तम संधी आहेत. या भरतीबद्दलची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा खालील लेखात दिलेली आहे.
MSRTC Nagpur Bharti 2025
- भरतीचे नाव: महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ भरती २०२५
- एकूण रिक्त जागा: ३६७
- भरतीचा प्रकार: सरकारी नोकरी
- नोकरीचे ठिकाण: नागपूर आणि भंडारा
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या आधारावर अर्ज करू शकतात:
- शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार १० वी पास, १२ वी पास, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवीधर असावा. प्रत्येक पदासाठीची सविस्तर पात्रता अधिकृत जाहिरातीमध्ये पाहणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहेत.
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहेत.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
- अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग (Open category): ₹५९०
- राखीव प्रवर्ग (Reserved Category): ₹२९६
महत्त्वाच्या तारखा आणि निवड प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे, त्यामुळे त्वरीत अर्ज करणे आवश्यक आहेत.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ११ ऑगस्ट २०२५
- निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.
तुम्ही अर्ज कसा करू शकता?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी, तुम्ही खालील दिलेल्या लिंक्स वापरू शकता. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून सर्व माहितीची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आउहे.
- भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी: जाहिरात पहा
- भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: अर्ज करण्यासाठी क्लिक करा
टीप: वरील लेखातील माहिती अधिकृत जाहिरातीवरून घेण्यात आली आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व माहितीची पडताळणी करावी. कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाहीत.