Panjabrao Dakh Live Hawaman : जुलै महिन्यात चांगला पाऊस झालेला होता. ज्यामुळे शेतकरी देखील खूप आनंदात होते. पण आता गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी ऊन पडत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात काळजी वाढत आहेत की, आता पाऊस कधी परत येणार?
हे पण वाचा 👉 पीएम किसानचा २० वा हफ्ता खात्यात जमा; तुम्हाला आला का? मोबाईलवर लगेच चेक करा PM Kisan Yojana List
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
सध्याच्या या परिस्थितीत, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे.
- मुसळधार पावसाला कधी सुरुवात होणार? डख यांनी सांगितले आहेत की, सध्या पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांनी त्यांची शेतीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. कारण, ८ ऑगस्टच्या रात्रीपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहेत. त्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढणार.
- या जिल्ह्यांना धो-धो पाऊस होणार: कर्नाटक व तेलंगणा या राज्यांमध्ये ७ ऑगस्टपासून पाऊस सुरू होणार. त्यानंतर महाराष्ट्रातील सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुणे, कोकण, परभणी, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ९ ऑगस्टपासून जोरदार पाऊस पडणार आहे.
- अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्वाचा अंदाज: ८ ते १२ ऑगस्टदरम्यान राहुरी, कोपरगाव, शिर्डी, राहता, संगमनेर, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर शहरामध्ये इतका जोरदार पाऊस होईल की, शेतांमधून पाणी बाहेर करणार आहे. हा पाऊस खरीप पिकांसाठी खूपच फायदेशीर ठरेल.
- उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस: धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे.
- विदर्भात पावसाचा जोर वाढणार: पूर्व विदर्भात (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती) १४ ते १६ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहेत. पश्चिम विदर्भात (बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती) ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान दररोज पाऊस पडणार आहे.
- मराठवाड्यातील पुढील जिल्ह्यांना इशारा: नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये ८ ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात होणार आणि ९ ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस पडलेला.
महत्त्वाचा सल्ला कोणता?: डख यांनी सांगितलेले आहेत की, या काळात विजांचे प्रमाण जास्त असणार, त्यामुळे शेतकऱ्यांनी विजा चमकतेवेळी झाडाखाली थांबू नयेत.
तुमची शेतीची कामे ८ ऑगस्ट अगोदर पूर्ण करावी, म्हणजे येणाऱ्या पावसाचा तुम्हाला पुरेपूर फायदा घेता येणार!
Disclaimer: ही हवामानाची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार आहे. हवामान कधीही बदल होऊ शकते, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे ठरत असते.