पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर! आता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा Pik Vima Yojana Last Date

Pik Vima Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे! शेतकऱ्यांच्या कमी प्रतिसादामुळे सरकारने पीक विमा योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवलेली आहेत. यापूर्वी ही मुदत 31 जुलैपर्यंत होती, जी आता वाढवून 14 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहेत.

Pik Vima Yojana

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा काढलेला नाहीत, त्यांच्यासाठी ही एक नवीन सुवर्णसंधी आहे. सरकारने या वाढलेल्या मुदतीचा लाभ घेऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहेत.

सर्व महिलांना महिन्याला 7000 रुपये मिळणार; बिमा सखी योजना अर्ज, पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण माहिती Bima Sakhi Yojana
सर्व महिलांना महिन्याला 7000 रुपये मिळणार; बिमा सखी योजना अर्ज, पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण माहिती Bima Sakhi Yojana

मुदतवाढ का करण्यात आली?

सरकारने 2022 पासून सुरू केलेल्या पीक विमा योजनेत बदल करून एक सुधारित योजना लागू केलेली होती. या नवीन योजनेत उत्पादन आधारित आणि 80:110 या मॉडेलचा वापर करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले होते. मात्र, या योजनेतील काही अटी शेतकऱ्यांसाठी जाचक असल्यामुळे, शेतकऱ्यांनी सध्या या योजनेकडे पाठ फिरवलेली आहे. परिणामी, योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही खूपच कमी होती. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने आता अर्ज करण्याची मुदत वाढवून शेतकऱ्यांना आणखी एक संधी दिलेली आहे.

योजनेत सहभागी कसे व्हायचे? महत्वाचे मुद्दे

जर तुम्ही अजूनही पीक विमा काढलेला नसेल, तर खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही अर्ज करू शकतात:

सोयाबीन दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह बाजार भाव पहा! Soyabean Rate Today
सोयाबीन दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह बाजार भाव पहा! Soyabean Rate Today
  • अंतिम तारीख: योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत आता 14 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहेत.
  • आवश्यक अटी: योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक असणे आणि ई-पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आलेली आहे.
  • ऐच्छिक सहभाग: ही योजना कर्जदार तसेच बिगर-कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहेत.
  • महत्त्वाची सूचना: ई-पीक पाहणी आणि विमा काढलेल्या पिकांमध्ये तफावत आढळल्यावर, तुमचा विमा अर्ज रद्द केला जाईल आणि भरलेला हप्ता जप्त होईल, त्यामुळे याची विशेष काळजी घ्यावी.

तुमच्या पिकांच्या संरक्षणासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहेत. या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन वेळेत तुमचा अर्ज सादर करावेत आणि आपल्या पिकाला सुरक्षित करावेत.

Leave a Comment