Samsung Galaxy A17 5G Launch: नमस्कार मित्रांनो! सॅमसंगच्या फोनची वाट बघत असणाऱ्या सर्वांसाठी एक चांगली बातमी आहे. स्मार्टफोन मार्केटमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी सॅमसंगने त्यांचा नवा आणि दमदार सॅमसंग गॅलेक्सी ए१७ 5G (Samsung Galaxy A17 5G) स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कमी किंमतीत आकर्षक फीचर्स देण्याचा कंपनीचा प्रयत्न या फोनमधून दिसून येत आहे.
Samsung Galaxy A17 5G Launch
हा फोन याच वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए१६ 5G चा अपग्रेडेड मॉडेल आहे. यात ५००० mAh ची मोठी बॅटरी आणि ५० मेगापिक्सेलचा दमदार कॅमेरा असे अनेक आकर्षक फीचर्स या मोबाईल मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. चला, या फोनबद्दल अधिक माहिती घेऊयात.
फोनची मुख्य वैशिष्ट्ये
सॅमसंगने या फोनमध्ये अनेक आधुनिक आणि उपयुक्त फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे हा फोन नक्कीच आकर्षक वाटतोय.
- उत्कृष्ट डिस्प्ले: फोनमध्ये ६.७ इंचाचा FHD+ इन्फिनिटी-U सुपर AMOLED डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन १०८० x २३४० पिक्सेल असून, हा डिस्प्ले ९०Hz रिफ्रेश रेट फीचरला सपोर्ट करतो. यामुळे व्हिडिओ पाहताना किंवा गेम खेळताना चांगला अनुभव मिळतोय.
- दमदार प्रोसेसर: या फोनमध्ये Exynos १३३० प्रोसेसर वापरला आहे, ज्यामुळे फोनची कार्यक्षमता चांगली राहतेय.
- कॅमेरा सेटअप: या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि दोन मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहेत.
- मोठी बॅटरी: यात ५००० mAh ची मोठी बॅटरी असून, २५W USB टाइप-C चार्जिंग फीचर आहे. यामुळे फोन लवकर चार्ज होतो आणि जास्त वेळ टिकतोय.
- सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी: फोनच्या साइडला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या फोनला IP५४ रेटिंग मिळाले आहे. तसेच, यात 5G/4G नेटवर्क, ब्लूटूथ ५.३, वाय-फाय आणि USB टाइप-C सारखी फीचर्स आहे.
किंमत आणि उपलब्ध व्हेरिएंट
सॅमसंगने हा फोन युरोपियन बाजारात लॉन्च केला आहे. भारतीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे २४ हजार रुपये असण्याची शक्यता आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत:
- ४ जीबी रॅम / १२८ जीबी स्टोरेज
- ८ जीबी रॅम / २५६ जीबी स्टोरेज
फोन तीन आकर्षक रंगांमध्ये म्हणजेच ब्लू, ब्लॅक आणि ग्रे मध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.
थोडक्यात सारांश
हा फोन खासकरून अशा ग्राहकांसाठी तयार केला आहेत. ज्यांना चांगला डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि उत्तम कॅमेरा कमी बजेटमध्ये हवा आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए१७ 5G हा जुन्या मॉडेलचा एक प्रभावी अपग्रेड आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडणार आहे.