SBI मध्ये 6589 मोठी भरती सुरू; पगार पात्रता अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती येथे पहा SBI Recruitment 2025

SBI Recruitment 2025: तुम्ही बँकेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत आहात का? तर तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे! भारतीय स्टेट बँक (SBI) ने देशभरातील विविध शाखांमध्ये ज्युनिअर असोसिएट (ग्राहक सेवा आणि सहाय्यता) या पदांसाठी तब्बल ६५८९ जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. दहावी पास असो वा पदवीधर, ही संधी कोणालाही सोडू नये अशीच आहेत. या भरतीबद्दलची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि निवड प्रक्रिया खालील लेखात संपूर्ण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत.

SBI Recruitment 2025

भरतीची प्रमुख माहिती

  • पदाचे नाव: ज्युनिअर असोसिएट (Junior Associate)
  • एकूण रिक्त जागा: ६५८९
  • भरतीचा प्रकार: सरकारी बँक नोकरी
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: ६ ऑगस्ट २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑगस्ट २०२५
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर (महाराष्ट्रासाठी ४७६ जागा)

पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही खालील पात्रता निकष पूर्ण करता की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहेत.

Panjabrao Dakh Weather Report
शेतकऱ्यांनो! ‘एवढे दिवस’ पावसाचा खंड पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज पहा Panjabrao Dakh Weather Report
  • शैक्षणिक पात्रता: तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात किंवा शेवटच्या सत्रात शिकणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. मात्र, अंतिम नियुक्तीवेळी त्यांना पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक सादर करावे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांदरम्यान असावे.
  • वयामध्ये सूट: सरकारी नियमांनुसार, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट दिली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड दोन मुख्य टप्प्यांमध्ये केली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य होणार आहे.

  1. पूर्व परीक्षा (Preliminary Exam):
    • ही परीक्षा १०० गुणांची असेल.
    • यात इंग्रजी भाषा, गणितीय क्षमता आणि तार्किक क्षमता (Reasoning Ability) यावर प्रश्न विचारले जाणार आहेत.
    • परीक्षेसाठी एक तासाचा वेळ दिला जाईल.
  2. मुख्य परीक्षा (Main Exam):
    • पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
    • ही परीक्षा २०० गुणांची असून, यात १९० प्रश्न असतील.
    • या परीक्षेत वित्तीय जागरूकता, जनरल इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी यावर प्रश्न विचारले जाणार आहेत.
    • या परीक्षेचा कालावधी २ तास ४० मिनिटे असेल.
    • मुख्य परीक्षेसोबतच स्थानिक भाषा चाचणी देखील घेतली जाईल, जी ५० गुणांची होणार आहे.

महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत?

राज्यातील उमेदवारांसाठी ही एक विशेष संधी आहे, कारण या भरती प्रक्रियेत महाराष्ट्रातून एकूण ४७६ जागा भरल्या जाणार आहे. याव्यतिरिक्त, काही बॅकलॉग म्हणून राहिलेल्या जागा देखील भरल्या जातील, ज्यामुळे एकूण जागांची संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढू शकते अशी माहिती देखील देण्यात येत आहे.

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला १५०० रुपये सोबत आणखी एक मोठे गिफ्ट! Ladki Bahin Yojana July Gift
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला १५०० रुपये सोबत आणखी एक मोठे गिफ्ट! Ladki Bahin Yojana July Gift

अर्ज कसा कराल?

अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

  • अर्ज करण्यासाठी: स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटला (sbi.co.in/careers) भेट द्या.
  • जाहिरात तपासणी: अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व माहितीची खात्री करा.

टीप: तुम्ही अंतिम तारखेची वाट न पाहता, लवकर अर्ज करणे चांगले राहील.

रेशनकार्ड वरिल चुकीची माहिती आता 5 मिनिटांत दुरुस्त करा! जाणून घ्या, सोपी प्रक्रिया Ration Card List
रेशनकार्ड वरिल चुकीची माहिती आता 5 मिनिटांत दुरुस्त करा! जाणून घ्या, सोपी प्रक्रिया Ration Card List

अशाच प्रकारच्या सरकारी योजना माहिती तसेच सरकारी नोकरीसाठी आमचं व्हाट्सअप ग्रुप लवकर जॉईन करा म्हणजे तुम्हाला घरबसल्या सर्व माहिती मिळेल

Leave a Comment