तुर दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह बाजारभाव पहा Tur Rate Today

Tur Rate Today : आज, ४ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आली आहे. विशेष म्हणजे, मागील दिवसांच्या तुलनेत आवक कमी असूनही दरांनी वेग पकडलेला दिसतो आहे. राज्यभरातून आज एकूण ८,५३७ क्विंटल तुरीची आवक झालेली होती, जी आधीच्या दिवसांच्या तुलनेत सुमारे ३० टक्क्यांनी कमी आहे. यामागे पावसाचा प्रभाव, शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवण्याचा निर्णय आणि आर्थिक अडचणी ही प्रमुख कारणे असू शकतात, असे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.

एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate
एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate

राज्यातील बाजार समितीनुसार तुरीचे दर:

  • लातूर: येथे सर्वाधिक ३,४९३ क्विंटल आवक झालेली असून आणि सरासरी दर ६,२०० रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
  • अकोला: येथे ८७३ क्विंटल आवक झालेली असून, सरासरी दर ६,४८५ रुपये प्रति क्विंटल पळायला मिळालेला होता.
  • नागपूर: येथे ८६८ क्विंटल आवकेसाठी सरासरी दर ६,३८३ रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेलेला आहे.
  • जालना (पांढरी तूर): येथे २४४ क्विंटल आवक झाली असून, दर ६,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले पाहायला मिळत आहे.
  • मानोरा: या बाजारात तुरीला ३,६०० ते ६,४४० रुपयांपर्यंत दर मिळाला, सरासरी दर ५,७७१ रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळालेला होता.

सर्वाधिक दर मिळालेल्या तुरीच्या जाती कोणत्या?

  • करमाळा येथे (काळी तूर): या जातीला ७,००० रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला होता.
  • अकोला येथे (लाल तूर): येथे लाल तुरीचा दर ६,६७५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते.
  • जालना, तुळजापूर व गेवराई (पांढरी तूर): या ठिकाणी पांढऱ्या तुरीला ६,५५० ते ६,६६५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता.
  • गज्जर तूर: हिंगोली आणि मुरुम येथे चांगली मागणी देखील होती आणि सरासरी ६,१०० ते ६,३५० रुपये दर मिळाला होता.

या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार; तुमचा जिल्हा आहे का? जिल्ह्याची यादी पहा Shaktipeeth Highway District List
या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार;जिल्ह्याची यादी जाहीर Shaktipeeth Highway District

Leave a Comment