Vihir Anudan List: महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत, जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी पात्र शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे आहे. असा उद्देश निश्चित करण्यात आला आहे.
विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान
योजनेसाठी पात्रता आणि अटी:
- अर्जदार अनुसूचित जमातीचा असावेत.
- त्याच्याकडे ०.४० ते ६ हेक्टरपर्यंत शेतजमीन असावीत.
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड, आधारशी संलग्न बँक खाते, ७/१२ उतारा आणि ८अ दाखला असणे अनिवार्य आहेत.
- बीपीएल (BPL) शेतकऱ्यांना आणि दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
- विहिरीची नोंद ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक आहेत.
अर्ज प्रक्रिया कशी आहे:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधता साधता येणार आहे.